तोंडातील लाळ (थुंकी) तुमचे अनेक आजार बरे करू शकते, पहा कसा करावा याचा वापर

तुम्हाला आठवते का आपण लहानपणी खेळताना पडलो आणि लहानमोठे खरचटले की तोंडातील लाळ म्हणजेच थुंकी काढून लागलेल्या जागी लावून पुन्हा लगेच खेळायला लागायचो. पण जस जसे आपण मोठे होत गेलो तस तसे आपण या गोष्टी विसरलो आणि मग प्रत्येक वेळी डॉक्टरच्या फेऱ्या मारायला लागलो. असो या झाल्या आपल्या लहानपणीच्या गोष्टी. पण आज आपण येथे याच विनामुल्य औषधाचे फायदे आणि त्याचा वापर कसा करावा हे पाहणार आहोत.

आपल्या माहीतीसाठी सांगू इच्छितो की खालील माहीती श्री राजीव दीक्षित यांनी सांगितली आहे. खाली सांगितलेले सर्व उपाय करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करून झोपा आणि सकाळी उठल्यावर दात न घासता, गुळणी न करता आणि तोंडातील थुंका बाहेर न फेकता सर्वात पहिले खालील उपायासाठी वापरा.

तुम्हाला चष्मा असेल तर तर सकाळी उठल्यावर गुळणी न करता किंवा दात न घासता तोंडातील थुंकी आपण डोळ्यांना काजळ लावतो त्यापद्धतीने डोळ्यांना थुंकी लावा. अशी थुंकी तुम्ही रात्री झोपताना आणि सकाळी 5 वाजता लावा कारण त्यानंतर तुम्ही 1-2 तासांनी आपले तोंड धुतले / अंघोळ केली तर तो पर्यंत लाळेने आपले काम केलेले असेल. राजीव दीक्षित म्हणतात हा प्रयोग अत्यंत यशस्वी आहे आणि 100% तुमचा चष्मा घालवणारा आहे. पण यासाठी नियमित तुम्हाला हा उपाय करायचा आहे हळूहळू तुमच्या चष्म्याचा नंबर शून्य होण्यास सुरुवात होते आणि लाळेचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. लाळ डोळ्यांची नजर (6/6) वाढवतो.

तोंडातील लाळ ही शरीरासाठी अमृता समान आहे. तुम्हाला कितीही मोठ्या नंबरचा चष्मा असो खालील उपाय केल्याने हळूहळू चष्म्याचा नंबर कमी होण्यास सुरुवात होते आणि एक दिवस तुम्हाला बिना चष्म्याचे सामान्य दिसायला लागते.

जर तुमच्या डोळ्यांच्या खाली काळे वर्तुळे असतील तर सकाळी उठल्यावर लाळेने हळूहळू मालिश करा, यामुळे डोळ्याखालील काळे वर्तुळ हळूहळू कमी होऊन त्वचा सामान्य होते हा प्रयोग तुम्ही 1-2 महिने दररोज करावा.

आता अत्यंत महत्वाचा उपाय कारण डायबिटीज झालेल्या लोकांना जर जखम झाली असेल तर ती बरी होत नाही हे तुम्हाला माहीत असेलच आणि जखम वाढल्यामुळे अनेक वेळा अवयव कापण्या पर्यत दुखणे वाढते हे तुम्हाला माहीत आहे त्यामुळे हा साधा आणि सोप्पा उपाय अनेक लोकांना अपंग होण्या पासून वाचवणारा होऊ शकतो. तर उपाय हा आहे की जर डायबिटीज झालेल्या व्यक्तीस जर जखम झाली असेल तर त्याने सकाळी उठल्यावर तोंडातील लाळ जखम झालेल्या जागी लावावी यामुळे घाव हळूहळू भरण्यास सुरुवात होते.

ज्यालोकाना भाजल्यामुळे / चटका लागल्यामुळे त्वचेवर काळा डाग पडला असेल त्यांनी सकाळी लाळेने डाग पडलेल्या जागी मालिश करावी. यामुळे डाग हळूहळू फिका पडेल आणि त्वचेच्या रंगा सारखा सामान्य होईल.

ज्यालोकाना खाज-खरुज झाली असेल त्यांनी दररोज लाळ सकाळी विना गुळणी करता इन्फेक्शन झालेल्या जागी लावावी बघता बघता त्वचा सामान्य होईल.

अश्या पद्धतीने लाळ अनेक आजारांवर गुणकारी आहे. चला पाहूया काय असते तोंडातील लाळे मध्ये ?

टायलीन नावाचे एंजाइम लाळेत असते जे आपल्या पचनशक्तीला वाढवते. पण मित्रांनो जर तुम्ही गुटखा, तंबाखू खाता आणि सारखे थुंकत असाल तर हळूहळू ही लाळ तयार होणे बंद होते आणि तोंडाचा कैन्सर होण्याची भीती वाढते. या लालेचा PH मानक 8.3 असतो. सोबतच आपण जे सकाळी टूथपेस्ट करतो ते बंद केले पाहिजे कारण यामुळे लाळ आपण थुंकतो. या एवजी कडुलिंब किंवा बबुलने दात घासा. असे दात स्वच्छ केल्यामुळे ही लाळ सर्वाधिक तयार होते. जर तुम्ही कडुलिंब किंवा बबुलच्या काडीने दात घासणार असाल तर जेवढी काडी वापरली आहे तेवढी कापून टाका आणि उरलेली पाण्यात ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी त्या काडीने दात स्वच्छ करा.

कृपया लक्ष द्या :

वरील सर्व माहीती वाचल्या नंतर तुम्हाला समजले असेलच की ही माहीती किती बहुमुल्य आहे आणि समाजाच्या हिताची आहे म्हणून ही माहीती लाईक करण्या एवजी जास्तीत जास्त शेयर करा ज्यामुळे अनेक गरजू लोकांना याचा फायदा होईल. यासाठी शेयर करायला विसरू नका.

स्रोत : श्री राजीव दीक्षित यांच्या व्याख्याना मधून.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares
error: Content is protected !!