जाणून घ्या ५०० आणि २००० च्या छपाई मध्ये किती येतो खर्च .. वाचा नोटांबद्दल सर्व माहिती !

नोटबंदीचा तो काळ तुम्हा सर्वांना आठवत असेल जेव्हा पंतप्रधांनी जाहीर केले कि आजपासून ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. नंतर समजले कि २००० ची नोट आपण atm मधून काढू शकतो. २००० ची नोट हातात घ्यायला सगळे उत्साहित होते. जेव्हा लोकांच्या हातात नोट आली तेव्हा अनेकांची निराशा झाली कारण नोटेचा कागद हा खूपच पातळ होता. काही लोकांना तर २००० ची नोट ही खोटी वाटायला  लागली होती. तुमचा मनात हा प्रश्न आला असेल कि या या पातळ नोटांना छापण्यासाठी किती खर्च आला असेल ? जाणून घ्या किती खर्च येतो आणि कोण छापतात.

यांच्याकडे आहे नोट छापण्याचा अधिकार

भारतात नोटा छापण्याचा अधिकार RBI कडे आहेत. १ रुपयाची नोट सोडून सर्व नोटा या RBI च्या प्रेसमध्ये छापल्या जातात.

१ रुपयाची नोट छापण्याचा अधिकार यांच्याकडे आहे

१ रुपयांची नोट आणि नाणे छापण्याचा अधिकार वित्त मंत्रालयाकडे आहे. त्यामुळे १ रुपयाच्या नोटेवर गव्हर्नरच्याऐवजी वित्त सचिवाची सही असते. वित्त मंत्रालय १ रुपयाचे नोट आणि नाणी छापून ते RBI कडे पाठवून देतात.

किती चलन छापायचं आहे हे कसे ठरवले जाते ?

रिझर्व्ह बँक किती मुद्रा छापेल ? हे १९५७ पासून किमान आरक्षण प्रणाली च्या आधारावर ठरवले जाते. किमान आरक्षण प्रणालीमध्ये RBI २०० करोडची संपत्ती स्वतः जवळ ठेवतात. यात ११५ करोडचे सोने आणि ८५ करोडच्या विदेशी मुद्रा असतात.

नोटबंदीनंतर वाढला खर्च

नोटबंदीनंतर ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा चालतात नव्हत्या. त्यामुळे  RBI  ला २००, ५०० आणि २००० च्या नोटा जास्त प्रमाणात छापाव्या लागल्या होत्या.

५०० रुपयाच्या नोटा छापायला लागला एवढा खर्च

वित्त राज्य मंत्री राधाकृष्णन यांच्या अनुसार नोटबंदीनंतर ८ डिसेंबरपर्यंत ५०० च्या एकूण १६५७. ७ करोड नवीन नोटा छापल्या गेल्या आहेत.

५०० रुपयाच्या नोटा छापायला इतका आला खर्च

५०० रुपयाच्या ११६९५.७ करोड नोटा छापायला RBI ने  १२९३.६ करोड रुपये खर्च केले आहेत. म्हणजे १नोट छापायला त्यांना २. ९४ रुपये इतका खर्च आला होता.

२००० रुपयाच्या नोटा छापायला लागला इतका खर्च

नोटबंदीनंतर आत्तापर्यंत RBI द्वारा २००० रूपपायाच्या एकूण ३६५. ४ करोड नोटा छापल्या गेल्या आहेत. ज्यांना छापायला एकूण १२९३. ६ करोड रुपये खर्च आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

62Shares
error: Content is protected !!