विश्‍वगुरु भारताने संपूर्ण विश्‍वाला दिलेली अद्भुत शोधांची देणगी !

गणित

प्रमेय : बोधायन ऋषींनी सर्वप्रथम प्रमेय समजावून सांगितले होते, ज्याला आज आपण ‘पायथागोरसचे प्रमेय’ या नावाने ओळखतो.

शून्य आणि बायनरी प्रणाली : ‘शून्य’ आणि ‘बायनरी’ प्रणाली हा आर्यभट्टांचाच शोध होता. नासाचे वैज्ञानिक डॉ. ब्रिग्स म्हणतात, ‘‘आपण हे विसरू नये की, गणितातील शून्यसुद्धा भारतीय विचारवंतांची देणगी आहे आणि बायनरी पद्धत, जी आता संगणकात वापरली जाते, तीसुद्धा भारताचाच शोध आहे.

गणिताची स्थानिक मूल्ये (value system) आणि दशांश अपूर्णांक पद्धत : ख्रिस्तपूर्व १०० मध्ये भारताने गणिताची स्थानिक मूल्ये (value system) आणि दशांश अपूर्णांक पद्धत विकसित केली होती. तेव्हाच जगातील महान भौतिक वैज्ञानिक अलबर्ट आइनस्टाईनने म्हटले आहे, ‘‘आम्ही भारतियांचे अत्यंत ऋणी आहोत; कारण त्यांनी आम्हाला गणती करायला शिकवली. तिच्याविना कोणताही महत्त्वाचा वैज्ञानिक शोध केला जाऊ शकत नाही.

त्रिकोणमिती (ट्रिग्नॉमॅट्री) आणि बीजगणित (अल्जेब्रा) : गणितातील त्रिकोणमिती (ट्रिग्नॉमॅट्री) आणि बीजगणित (अल्जेब्रा) विषय ही जगाला भारताची देणगी आहे. ‘कॅलक्युलस’ चा शोध न्यूटनच्या कित्येक वर्षांपूर्वी चौदाव्या शतकात केरळचे विद्वान आणि गणिततज्ञ यांनी लावला होता.

वर्ग समीकरण सोडवण्याचा नियम : अकराव्या शतकात श्रीधराचार्य यांनी बीजगणितात अनेक महत्त्वाची सूत्रे शोधली. वर्ग समीकरण (Quadratic Equations) सोडवण्याचा नियम आजही ‘श्रीधर नियम’ अथवा ‘हिंदू नियम’ या नावाने प्रचलित आहे. यांच्या ग्रंथांमध्ये अंकगणित आणि क्षेत्रव्यवहाराचे विशेष विवरण आहे.

श्रीनिवास रामानुजन् हे भारताचे जगप्रसिद्ध गणितज्ञ होते, ज्यांनी बनवलेले गणिताचे एकेक उदाहरण सोडवण्यासाठी जगातील मोठमोठ्या गणिततज्ञांना कित्येक वर्षे लागली.

विज्ञान आणि तंत्रज्ञान

अणू संकल्पना : महर्षि कणाद यांनी आधुनिक वैज्ञानिक डाल्टन यांच्या सहस्रो वर्षांपूर्वी अणूची संकल्पना आणि वैेषेयिक दर्शनाचे संशोधन केले होते.

विमानविद्या : भारद्वाज ऋषि हे वैदिककालीन विमानविद्येचे प्रणेते आहेत. त्यांच्या ‘वैमानिक प्रकरणम्’ या ग्रंथात विमानविद्येची सविस्तर माहिती आढळते. सध्याचे पुरातन हस्तलिखित लिपीचे संशोधक आणि पुरालेखवेत्ता श्री. गणेश नेर्लेकर देसाई यांना कळून चुकले की, भारद्वाज ऋषींच्या या ग्रंथाच्या आधारे राईट बंधूंच्या आधी १० वर्षे मुंबईतील श्री. शिवकर तळपदे यांनी पहिले विमान उडवले होते.

गुरुत्वाकर्षणाचा शोध : भास्कराचार्यांनी न्यूटनच्या आधी गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधला होता.

अणूशक्ती : डॉ. होमी भाभा यांनी अणूशक्तीच्या क्षेत्रात कित्येक महत्त्वाचे शोध लावले.

बिनतारी संदेश अमेरिकेच्या IEEE नामक संघटनेने एक शतक जुनी शंका दूर करत सिद्ध केले की, बिनतारी (वायरलेस) संचाराचे मार्गदर्शक मारकोनी नसून प्राध्यापक जगदीशचंद्र बोस होते; म्हणून नभोवाणी, दूरदर्शन, भ्रमणभाष वगैरेंच्या संशोधनाच्या मुळाशीही जगदीशचंद्र बोसच आहेत. बोस भौतिक, जीव, वनस्पती, तसेच पुरातत्व विज्ञानाचे विशेषज्ञ आणि ‘क्रेस्कोग्राफचे’ सर्वप्रथम संशोधक होते. नभोवाणी आणि सूक्ष्म तरंगांच्या प्रकाशिकीवर कार्य करणारे ते पहिले वैज्ञानिक होते.

भाषा आणि खगोलशास्त्र : लॅटीन भाषेद्वारे संस्कृत भाषेला सर्व युरोपियन भाषांची जननी मानले जाते. वर्ष १९८७ मध्ये छापलेल्या मासिकानुसार संस्कृत भाषा संगणकासाठी सर्वांत उपयुक्त भाषा आहे. आजच्या खगोेेल शास्त्रज्ञांच्या शेकडो वर्षांपूर्वीच पाचव्या शतकात भास्कराचार्य यांनी सौरवर्ष ३६५.२५८७५६८४ दिवसांचे असल्याचे सांगितले होते.

आयुर्वेद आणि शल्यचिकित्सा

मानवाच्या माहितीनुसार आयुर्वेद ही सर्वांत प्राचीन चिकित्साप्रणाली आहे, ती स्वतः भगवान धन्वंतरी यांची देणगी आहे आणि आचार्य चरक आयुर्वेदाचे महान चिकित्सक होते. ते ‘चरकसंहिते’चे रचनाकारही होते.

शल्यचिकित्सेचे जनक (Father of Surgery) महर्षि सुश्रुत होते. आजपासून २ सहस्र ६०० वर्षांपूर्वी महर्षि सुश्रुत आणि भारताच्या इतर स्वास्थ्य वैज्ञानिकांनी प्रसुती, मोतीबिंदू, अस्थिभंग, मूतखडा इत्यादींच्या शल्यचिकित्सा केल्या होत्या.

जगातील पहिले विश्‍वविद्यालय – तक्षशिला

जगातील सर्वांत पहिले विश्‍वविद्यालय ‘तक्षशिला’ हे ख्रिस्तपूर्व ७०० मध्ये भारतात स्थापित करण्यात आले होते. त्यात संपूर्ण विश्‍वातील १० सहस्र ५०० हून अधिक विद्यार्थी ६० पेक्षा अधिक विषय शिकत होते. पाचव्या शतकात हुणांनी भारतावर विध्वंसक आक्रमण केले. त्यात तक्षशिलानगर उद्ध्वस्त झाले.

शैक्षणिक क्षेत्रात प्राचीन भारताची सर्वांत उच्च उपलब्धी असलेल्या ‘नालंदा’ विश्‍वविद्यालयाची स्थापना पाचव्या शतकात बिहारमध्ये झाली होती. या विश्‍वविद्यालयाला बाराव्या शतकात तुर्क आक्रमणकारी बख्तियार खिलजीने जाळून नष्ट केले होते.

दोन्ही विश्‍वविद्यालयांचा विनाश, तसेच शिक्षणाची ज्ञानमंदिरे, मठ आणि गुरुकुले यांचा विनाश हा खगोल, विज्ञान, गणित, रसायनविद्या, शरीररचना वगैरे विज्ञानाच्या क्षेत्रात भारताने केलेले महान संशोधन नष्ट करण्याच्या हेतूने करण्यात आला होता.

योग आणि अध्यात्म यांसाठी जगात सदैव अग्रगण्य असणारा भारत !

संपूर्ण विश्‍वाच्या उद्धारासाठी सक्षम वेद, पुराण, उपनिषदे, रामायण, श्रीमद्भागवत, श्रीमद्भगवद्गीता वगैरे सद्ग्रंथ भारताच्या संत-महापुरुषांचीच देणगी आहेत. जगभरातील मनुष्याचे सर्वांत मोठे संघटन भारतात कुंभमेळ्याच्या रूपात आयोजित केले जाते.

अनादिकाळापासून संपूर्ण विश्‍व भारताच्या अध्यात्म आणि योगविद्येने शांती अन् आनंद मिळवत आहे. त्याच समवेत स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, परमहंस योगानंद, स्वामी राम, साई श्री लीलाशाहजी महाराज यांसारख्या ब्रह्मज्ञानी संतांनी विदेशांत जाऊन असंख्य लोकांना भारताच्या महान वैदिक दर्शनशास्त्रांविषयी अवगत केले आणि आध्यात्मिकता, ध्यानयोग, शाकाहार इत्यादींचे महत्त्व सांगून त्या लोेकांचा दृष्टीकोेन पालटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

107Shares
error: Content is protected !!