शेव्हिंग करण्यापासून ते हेअर कटिंगपर्यंत ब्लेडचा वापर केला जातो. ???

शेव्हिंग करण्यापासून ते हेअर कटिंगपर्यंत ब्लेडचा वापर केला जातो. पण ब्लेडच्या मध्ये एक विशिष्ट डिझाइन का तयार केले गेले ? ब्लेडची निर्मिती करणा-या अनेक कंपन्या आहेत, पण त्या एकाच डिझाइनचा वापर का करतात ? या प्रश्नाची उत्तरे आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून देणार आहोत. ब्लेडच्या मध्ये असलेल्या या खास डिझाइनमागे आहे जिलेट कंपनी.

याच कंपनीने पहिल्यांदा ब्लेड तयार करायला सुरुवात केली होती. कशी डिझाइन झाली होती ब्लेड, जाणून घेऊयात..

‘किंग कँप जिलेट’ने केली होती सुरुवात

जिलेट कंपनीचे संस्थापक किंग कँप जिलेट यांनी 1901 साली त्यांचे सहकारी विलियम निकर्सन यांच्यासोबत मिळून ब्लेड डिझाइन केली होती. त्यावेळी तयार झालेले ब्लेडचे डिझाइन एवढ्या वर्षांत कधीही बदलण्यात आलेले नाही. किंग कँप जिलेट यांनी तयार केलेल्या डिझाइनचे पेटेंट करुन घेतले आणि 1904 साली याच्या उत्पादनाला सुरुवात केली. तेव्हापासून आज पर्यंत ब्लेडची एकच डिझाईन मार्केट मध्ये आली आहे.

नंतर आलेल्या सर्व कंपन्या याच डिझाईनला फॉलो करत आल्या आहेत. त्यामध्ये टोपाज आणि मारफक या प्रसिद्ध कंपन्यांचा ही समावेश आहे.

का असते ब्लेडमध्ये खास डिझाइन

आपण कधी हा विचार केला आहे का, की ब्लेडच्या मध्ये जी डिझाइन असते ती का असते. जेव्हा जिलेटने पहिल्यांदा ब्लेडची निर्मिती केली होती, तेव्हा त्यांनी ब्लेडचे फक्त 165 डिझाइन बनवले होते.

ब्लेडच्या मध्ये जी डिझाइन करण्यात आली होती

त्याचा हेतू शेव्हिंग करते वेळी ब्लेड सोप्या पद्धतीने बोल्टमध्ये सेट करता यावी. हेच कारण आहे की ब्लेडमध्ये विशिष्ट जागा सोडली जाते, जेणेकरून शेविंग करते वेळेस शेविंग हँड मध्ये अगदी आरामात फिट होईल. 1904 मध्ये जिलेट यांनी ब्लू जिलेट नावानी ब्लेडचे उत्पादन केले होते.

कशी सुचली होती ब्लेड बनवण्याची कल्पना

1890 मध्ये जिलेट कंपनीचे संस्थापक किंग कँप जिलेट बाटलीचे झाकण बनवण्याच्या कंपनीत सेल्समन होते. नोकरी करत असताना त्यांनी बघितले, की लोक वापरात आणलेल्या बाटल्यांचे झाकण फेकून देतात.

पण तरीसुद्धा एवढ्या छोट्याशा वस्तूमुळे मोठी कंपनी सुरु आहे. त्यांनीही अशीच एक लहानगी वस्तू बनवण्याचा विचार केला. लोकांनी वापर केल्यानंतर त्यांना ती फेकुन देता यावी, अशी वस्तू तयार करण्याचा जिलेट यांनी निर्णय घेतला. त्याकाळात लोक शेव्हिंगसाठी चाकुचा वापर करत असत.

किंग कँप जिलेट यांनी या वस्तूला पर्यायी वस्तू शोधण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दोन्ही बाजुनी धार असलेली सेफ्टी रेजर बनवली. 1901 डिसेंबर मध्ये त्यांनी डिझाइनला पेटेंट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

29Shares
error: Content is protected !!