इंटरनेट वर व्हायरल झालेली हि मुलगी आहेतरी कोण : क्लिक करून बघा इथे

सोशिअल मीडियावर सध्या एक व्हिडीओ खूप वायरल होत आहे. शाळेत सेमिनारच्या दरम्यान एक मुलगी आपल्या खास अंदाजात डोळ्यांच्या अदाकारीने तिच्या क्लासमेटला घायाळ करत आहे. त्यांचा हा व्हिडीओ तरुणांना खूप आवडत आहे. व्हिडीओ पाहून सर्वांच्या डोक्यात एकच प्रश्न येतोय कि हि मुलगी आहे तरी कोण ?

तर तुम्हाला सांगू इच्छितो कि हि मुलगी साऊथ चित्रपटातली अभिनेत्री आहे. आणि ह्या मुलीचे नाव प्रिया प्रकाश वारियर आहे. प्रिया मल्याळम चित्रपट ‘ओरू अदार लव्ह’ ह्या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करत आहे. परंतु चित्रपट रिलीज होण्याअगोदरच तिच्या ह्या व्हिडीओ ने इंटरनेट वर खळबळ उडवून दिली आहे. लोकांना तिचा नजरेतून नजरेमधला रोमान्स खूप आवडला आहे. केरळ मध्ये जन्मलेल्या ह्या अभिनेत्रीने चित्रपटात शाळेतल्या मुलीची भूमिका निभावली आहे.

व्हॅलेंटाईन्स डे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि बहुतांश सिंगल तरुणांना त्यांची लेटेस्ट क्रश सापडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत डोळा मारणारी ही तरुणी देशभरातील लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन झाली आहे. ‘ओरु अदार लव्ह’ या मल्ल्याळम चित्रपटातून पदार्पण करणारी ही नवोदित अभिनेत्री आहे प्रिया वॉरियर.

गेल्या आठवड्याभरापासून एक तरुणी सोशल मीडिया सेन्सेशन ठरली आहे. शाळेच्या गॅदरिंगमध्ये एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थिनीकडे रोखून बघतो. दोघांमध्ये नजरानजर होते आणि ‘आँखो ही आँखो में बात हो गई’ असा काहीसा प्रकार घडतो. या तरुणीने नजरेने सोडलेल्या बाणाने तिचा मित्र तर घायाळ होतोच, मात्र हा व्हिडिओ पाहणारे नेटिझन्सही गार झाले आहेत. ही तरुणी आहे प्रिया प्रकाश वॉरियर. प्रिया अवघी 18 वर्षांची आहे. केरळातील थ्रिसूरमधल्या विमला कॉलेजमध्ये ती बीकॉमचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.

प्रियाचा हा चित्रपट ३ मार्च ला प्रदर्शित होत आहे. प्रमोशन साठी बनवलेल्या ह्या व्हिडीओ वर लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. आणि व्हिडीओ सुद्धा खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच प्रियाचे फोटो सुद्धा खूप व्हायरल होत आहे. कारण तिचा पहिलाच चित्रपट असल्यामुळे बहुतेक लोकं तिला ओळखत नाही आहेत. आणि ह्या व्हिडीओ ला नॉर्मल व्हिडीओ समजून लोकं शेअर करत आहेत.

सोशिअल मीडियावर प्रियाच्या सौंदर्याचे सुद्धा खूप कौतुक होत आहेत. ती केरळ येथील त्रिशूळ ची राहणारी आहे. तिला डान्स आणि ट्रॅव्हलिंगची आवड आहे. इतकेच नाही तर ती सोशिअल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते आणि एक उत्कृष्ट डान्सर सुद्धा आहे. प्रियाच्या हे गाणे युट्युबवर 6,511,506 पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे.

ओमर लुलू यांच्या ‘ओरु अदार लव्ह’ या मल्ल्याळम चित्रपटातून प्रिया पदार्पण करत आहे. ‘मणिक्या मलराया पूवी’ हे गाणं रिलीज करण्यात आलं. व्हायरल झालेली क्लीप ही त्याच गाण्याचा एक भाग आहे. हे गाणं शान रहमानने संगीतबद्ध केलं असून विनीथ श्रीनिवासनने गायलं आहे.

प्रियाचा व्हिडिओ व्हायरल होण्यावर प्रकरण थांबलं नाही, तर तिचे मीम्स, ट्रोल्सही झाले. ‘आई, सूनबाई मिळाली’, हीच माझी व्हॅलेंटाईन, शी इज माय लेटेस्ट क्रश अशा प्रतिक्रिया काहींनी दिल्या, तर काही जणांना याचं काहीच कौतुक वाटत नाही. मात्र काहीही असो, आपल्या अदांनी प्रियाने दखल घ्यायला भाग पाडलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

434Shares
error: Content is protected !!