दररोज घरामध्ये करा हे छोटेछोटे उपाय, दूर होईल घरातील नकारात्मक उर्जा

प्रत्येक व्यक्ती आयुष्यात समस्याग्रस्त आहे. पूर्वीच्या काळी लोकांना ज्या समस्या असायच्या आजही त्याच आहेत पण त्यांचे रूप बदलले आहे. पहिले देखील लोकांना धनाच्या संबंधीत समस्यांचा सामना करावा लागत असे आणि आजही लोक धनाच्या संबंधीत समस्यांचा सामना करत आहेत. पण पूर्वी धन हे एकमेव साधन नव्हते ज्याने लोक आपल्या गरजा पूर्ण करत असत.

आजच्या या आर्थिक युगामध्ये धन हे सर्वस्व झाले आहे. ज्याच्याकडे धन नाही तो आजच्या युगात काही करू शकत नाही. तर श्रीमंत व्यक्तींच्या मुठीत अवघे जग आहे. ते सर्वकाही सहज करू शकतात. अनेक वेळा आपल्या समस्या आणि अपयशाचे कारण घरातील नकारात्मक उर्जा असू शकते. जर घरामध्ये नकारात्मक उर्जा असेल तर कितीही प्रयत्न करा काम यशस्वी होत नाही. सोबतच आर्थिक समस्या देखील असतात. या समस्यांच्या पासून सुटका मिळवण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सुचवलेले आहेत.

शास्त्रात सांगितलेले उपाय

जर तुमच्या आयुष्यात समस्या असतील तर जास्त त्रास करून घेण्यापेक्षा सकाळी एक वाटीभर पाणी घराच्या छतावर सूर्याच्या प्रकाशात ठेवा. संध्याकाळी हे पाणी घेऊन या आणि आंबा किंवा अशोकच्या पानाच्या मदतीने घरात शिंपडावे. असे केल्यामुळे घरातील नकारात्मक उर्जा बाहेर निघून जाते.

जर घरात नकारात्मक उर्जा असतील तर घरातील कोणत्याही सदस्याला सुख मिळत नाही. घरातील सदस्यांना रात्री वाईट स्वप्न पडतात. जर तुमच्या घरामध्ये देखील असे काही असेल तर कापूर तुपामध्ये टाकून त्याला जाळावे. असे केल्याने घरातील सदस्यांना वाईट स्वप्न पडणे बंद होतील आणि चांगली झोप येईल.

दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सेंधव मीठ काचेच्या किंवा कोणत्याही भांड्यात ठेवावे. सकाळी प्रत्येक कोपऱ्यातील मीठ एकत्र करावे आणि वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. असे केल्यामुळे घरात आनंदाचे आगमन होते आणि घरातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.

संध्याकाळच्या वेळी घरामध्ये जेव्हाही पूजा कराल तेव्हा शंख जरूर वाजवा. फक्त एवढेच नाही तर शंखाने पाणी देखील शिंपडावे. असे मानले जातेकी दररोज शंखात पाणी भरून ते शिंपडल्याने घरातील नकारात्मक उर्जा बाहेर जातात. यानंतर घरामध्ये देवी-देवतांचा निवास होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

647Shares
error: Content is protected !!