हिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे ? जाणून या मागची वैज्ञानिक कारणे

मुळात आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. मी जर या हिंदू धर्माला श्रेष्ठ मानतो तर त्यामागे एकच कारण आहे कि हा धर्म कोणाच्या सांगण्यानुसार किवा एखाद्या ग्रंथाच्या उत्पत्ती बरोबर जन्माला आला नसून पिढ्या दर पिढ्या नवीन विचार आणि आचरण पद्धती घेऊन हा धर्म उत्क्रांत होत गेला आहे. कालानुरूप योग्य ते बदल यात केले गेले आहेत.निसर्ग आणि विज्ञान याचा अपूर्व संगम या धर्माच्या चाली रितीत आढळून येईल. विज्ञानाची सांगड आणि पर्यावरणाचा विचार आपल्या प्रत्येक चाली रितीत कसा केला आहे या बद्दल जर लिहायचं झालं तर मला वाटतं हजारो नव्हे लाखो पाणी ग्रंथ लिहावा लागेल. असो तर आपण जो प्रेताला अग्नी देण्याबद्दल प्रश्न केला आहे त्याबद्दलच बोलतो.

मुळात प्रेताला अग्नी दिल्याने पर्यावरण दुषित होतं हा युक्तिवाद कोणाही सुज्ञ मनाला पटणार नाही. कारण जर लाकडं जाळून प्रदूषण होत असतं तर आज आपलं पर्यावरण जेवढं प्रदूषित आहे त्यापेक्षा कैक पटीने ते जास्त प्रदूषित असतं….कारण हजारो वर्षापासून आपल्या भारतात चुलीसाठी आणि इतर अनेक गोष्टींसाठी लाकडे जाळण्यात येत आहेत. लाकडे जाळणे हे पर्यावरनालाच  नव्हे तर माणसालाहि कित्येक पटीने उपयुक्त आहे. आपण चुली बद्दलच आधी बोलू. चुलीत जी लाकडे जाळली जातात त्यामुळे जो धूर निर्माण होतो त्यामुळे घराच्या वाश्याना कीड लागत नाही. तसाच तो धूर डोळ्यात गेल्यामुळे डोळेही साफ राहतात….कारण जगातला कोणताही झाड हे निरुपयोगी नाही. त्यात काही ना काही उपयोगी औषधी गुणधर्म असतातच.

आता आपण प्रेताला जो अग्नी दिला जातो त्याबद्दल बोलूया. अंत्यविधीच्या वेळी जे सोपस्कार पार पडले जातात त्यात माणसाची मृत व्यक्तीबद्दलची भावना तर दिसून येतेच. पण त्या सोपस्कारात पर्यावरणाचा आणि समाज मनाचा विचार केलेलाही दिसून येतो. प्रेतावर जी फुले चढवतात याच बरोबर प्रेताच्या गळ्यात तुळशीपत्रांची माळहि घातली जाते. कारण प्रेताच्या आजूबाजूला जे अनेक जंतू असतात ते नष्ट व्हावे.

प्रेताला जो अग्नी दिला जातो त्यामुळे प्रेताबरोबर जे अनेक जंतू असतात तेही नष्ट होतात आणि त्याचबरोबर हवाही दुषित होत नाही. कारण तो जो धूर असतो तो अनेक झाडांच्या वाळक्या फांद्यांपासून तयार होतो. जर हेच प्रेत विद्युत दाहिनीत जाळले तर किती बेकार वास येईल याचा विचार करू शकतो. आकाशात जाणारा धूर आजूबाजूची हवाही शुद्ध करतो. कारण त्या लाकडांचे प्रमाण प्रेतापेक्षा जास्तच असते. शिवाय मी जसं आधी म्हटलं कि प्रत्येक झाध हे औषधी आहे. त्यामुळे हवा दुषित होण्याचा प्रश्नच येत नाही.

त्यानंतर जो अस्थी विसर्जनाचा सोपस्कार असतो त्यातही पर्यावरणाचा विचार आढळून येईल. जसं कि ती जी राख असते ती नदीत विसर्जित केली जाते. ती नंतर नदीतल्या गाळात मिसळून जमीन सुपीक करण्यास मदत करते अर्थात या बद्दल अनेक मतभेद असतील. पण एक पर्यावरणवादी म्हणून मी या सोपस्काराकडे बघतो आहे.

तसच आपल्यात सूतक म्हणून एक प्रथा आहे, ज्यात मृत व्यक्तीच्या घरातली बाकी मंडळी घराबाहेर पडत नाहीत. याचे कारण असे कि मृत व्यक्तीच्या संपर्कात काही काळ राहिल्याने त्या घरातल्या व्यक्तींना जर जंतू संसर्ग झाला असेल तर तो समाजात पसरू नये. हीच गोष्ट प्रेताला खांदा देऊन आल्यावर बाकीच्या मंडळीनी घरी जाऊन आधी बाहेर अंगणात अंघोळ करावी आणि मग घरात यावे यात आढळून येईल. स्नानात शुद्धी असे एक वाक्य आहे.

अर्थात हे आपण आपल्या परंपराकडे कश्या दृष्टीने बघतो यावर अवलंबून आहे. मी या गोष्टी आजूबाजूला घडत असताना त्यात काही वैज्ञानिक कारण आहे का??? समाजाचा विचार आहे का??? हेच बघत असतो. मान्य कि आपल्या समाजाने काही चुकीच्या परंपराही पाळल्या होत्या. पण त्यातला फोलपणा लक्षात येताच त्या त्यागल्याहि होत्या.

आता एक किस्सा सांगतो. मध्यंतरी माझ्या  आई विरुद्ध माझा मामा आणि मी असा वाद रंगला होतं. विषय हाच परंपरांचा होता. माझ्या आईचं म्हणणं होतं कि परंपरा नाही पाळल्या म्हणून काही फरक पडत नाही. तिने एक उदाहरण दिला कि ‘त्यांच्या गावात एक सरकारी अधिकारी आहे. ज्याने त्याच्या वडिलांच्या देहान्ता नंतर मुंडण विधी केला नाही. तो आज भरपूर श्रीमंत आहे.’मी त्यावर एवढंच म्हणलो कि, “प्रत्येक उगवती पिढी हि मागच्या पिढी पेक्षा दोन पावले पुढेच असते. त्याने त्याच्या वडिलांना केस ( मुंडण) दिले नाहीत. देव करो आणि तसं न होवो…पण जर उद्या त्याचं देहांत झालं तर त्याचा मुलगा कशावरून त्याला अग्नी देईल. तो म्हणेल माझ्या बाबांनी त्यांच्या बाबांना केस दिले नाहीत. त्यांचं काही झालं नाही.

तर मी माझ्या बाबांना अग्नी दिला नाही म्हणून काय बिघडणार आहे ? एम्ब्युलन्स ने प्रेत घेऊन जा आणि विद्युत दाहिनीत जाळा”. कोणी खात्री देऊ शकतो का कि असं होणार नाही. आपल्या परंपरा ह्या बांडगुळा सारख्या उगवलेल्या नाहीत. त्यांना प्रगल्भ विचारांची आणि विज्ञानाची जोड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

496Shares
error: Content is protected !!