८२ वर्षांच्या ‘रिव्हॉल्वर दादी’ जगातील सर्वात ज्येष्ठ महिला शार्पशूटर.

८२ वर्षांच्या चंद्रा तोमर यांच्यासाठी त्यांचे वय हा केवळ एक अंक राहिला आहे. त्या लोकप्रिय आहेत त्या ‘रिव्हॉल्वर दादी’ म्हणूनच. शूटींग या क्रीडा प्रकारात चंद्रो यांनी आतापर्यंत सुमारे २५पदके पटकावली आहेत. त्या जगातील एकमेव सर्वात ज्येष्ठ शार्पशूटर आहेत.

चंद्रो मुळच्या जोहरी गावातील, जे बागपत या उत्तरप्रदेशातील जिल्ह्यात आहे. सहा जणांची आई आणि १५जणांची आज्जी असलेल्या या क्रीडापटूने वयाच्या ६५व्या वर्षी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या नातीला जोहरी येथे रायफल क्लब मध्ये प्रवेश हवा होता. त्यावेळी चंद्रो यांनी रेंजवर पिस्तुल हाती घेतले आणि लक्ष्यभेद प्रत्येकवेळी अचूकपणे केला. त्यामुळे त्याचे सर्वांनाच अप्रूप वाटले.

त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. “ज्यावेळी मी पहिल्यांदाच माझे पिस्तुल चालविले,मी तरबेज झाले. आणि मी तेथे असलेल्यांना दाखवून दिले की माझे वय माझा अडथळा बनू शकत नाही. चंद्रो यांच्या या साहसाने इतर अनेक मुली आणि महिलांनाही धीर आला आणि त्यांनी या खेळासाठी गावात क्रांती घडवून आणली. आज तेथे २५ महिला आहेत ज्या घराच्या चार भिंतीबाहेर पारंपारिक जबाबदा-या आणि रितीभाती बाजुला ठेऊन आल्या आहेत आणि रायफल क्लब मध्ये प्रशिक्षण घेत आहेत.

२०१०मध्ये चंद्रो यांच्या कन्या सिमा यांनी रायफल आणि पिस्तुल या क्रीडा प्रकारात पहिले महिलांचे जागतिक पदक हस्तगत केले. त्यांची नात नितू सोळंकी यांनी देखील हंगेरी आणि जर्मनी येथील जागतिक शूटींग स्पर्धेत भाग घेतला होता.

प्रकाशी तोमर या ७७वर्षांच्या चंद्रो यांच्या नणंदेनेही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे आणि त्याही काही कमी नाहीत. “ त्यांनी एकदा उपअधिक्षक पोलीस यांनाही हरविले आणि त्यानंतर त्या अधिका-याने दीक्षांत समारंभात त्यांच्या समोर येऊन प्रदर्शन करण्यास नकार देत सांगितले की, एका ज्येष्ठ महिलेने त्यांचा पराभव केला आहे.” नितू शेरॉन म्हणाल्या. ज्या भारतीय क्रीडा प्रधिकरणाच्या प्रशिक्षिका आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares
error: Content is protected !!