उंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर ??

लोक उंदराच्या त्रासाने हैरान झालेले असतात. उंदीर आपले किमती सामानाची नासधूस करतात. तसे तर उंदीर म्हणजे गणपतीचे वाहन मानले गेले आहे पण जेव्हा ते माणसाला त्रास देतात तेव्हा त्यांना घराबाहेर काढणेच योग्य असते. चला पाहूया उंदरांना घराबाहेर काढण्याचा रामबाण उपाय.

उंदरांच्या त्रासा पासून मिळवा सुटका.

उंदरांच्या त्रासा पासून सुटका मिळवण्यासाठी पिपरमिंट एक चांगला उपाय आहे. पिपरमिंटचा वास उंदरांना बिलकुल आवडत नाही. कापसाचे तुकडे घेऊन ते पिपरमिंट मध्ये बुडवा. आता हे तुकडे उंदीर जेथे दिसतात किंवा जेथे येण्याची शक्यता असते तेथे ठेवा. या वासामुळे उंदराचा श्वास कोंडला जातो. त्यामुळे ते घराबाहेर जातात किंवा श्वास घुतल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो.

उंदरांना न मारता घराबाहेर काढण्याचा उपाय

पुदीना : पुदीना उंदरांच्या मध्ये भीती निर्माण करते. पुदीन्याची पाने किंवा फुले उंदीरांच्या बिळामध्ये टाकावी किंवा जर घरात उंदीर असतील तर घरात जेथे जेथे उंदरांचा वावर असतो तेथे पुदीना टाकावा याच्या वासामुळे उंदीर घराबाहेर पळून जातील.

तेज पत्ता : पुदिन्या प्रमाणेच तेज पत्ता पण उंदीर घराबाहेर काढण्यास मदत करते.

लाल मिरची : जेथून उंदीर घरामध्ये येतात जातात त्यांचा या मार्गात लाल मिरची पावडर टाकावी. असे केल्यामुळे उंदीर घरात पुन्हा येताना दिसणार नाहीत.

फिनाइलच्या गोळ्या : फिनाइलच्या गोळ्या कपड्यामध्ये ठेवल्यामुळे उंदरांचा त्रास कमी होतो. यामुळे उंदीर घरात येणार नाहीत.

माणसांचे केस : उंदरांना घराबाहेर काढण्याचा सर्वात सोप्पा उपाय आहे मानवाचे केस. तुम्हाला आश्चर्य वाटेल उंदीर पळवण्याचा सर्वात सोप्पा उपाय आहे कारण माणसाच्या केसांमुळे उंदीर पळून जातात. कारण त्यांना काढल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो यामुळे हे जवळ आल्यास ते घाबरतात.

तुमच्या घरात उंदीर येऊ नये म्हणून घरात साफसफाई करा. कधीही घरात कचरा अडगळ होऊ देऊ नका. सामान व्यवस्थित ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

286Shares
error: Content is protected !!