वेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार !

तुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते. जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो. आज आपण चर्चा करणार आहोत अशाच काही बॉलिवूडमधील सिताऱ्यांची जे थोडा काळ आपल्या समोर आले आणि नंतर या जगाचा निरोप घेऊन निघून गेले. यात तुमचे काही आवडते कलाकारदेखील असतील. चला मग जाणून घेऊया या कलाकारांविषयी ज्यांनी फार कमी काळात लोकांच्या मनात घर करून बसले आणि नंतर लवकरच या जगाचा निरोप घेऊन गेले.

१. विनोद मेहरा

हिंदी चित्रपटसृष्टीत विनोद मेहराच नाव आज पण एक उत्कृष्ट कलाकार म्हणून घेतले जाते. तरीपण त्यांचं आयुष्य जास्त मोठं नव्हतं. फक्त ४५ वर्षाच्या वयात त्यांनी जगाचा निरोप घेतला.

२. निर्मल पांडे

निर्मल पांडे यांनी मोजक्याच चित्रपटात काम केले. पण प्रत्येक पात्राद्वारे त्यांनी लोकांवर आपली एक वेगळी छाप पाडली. वयाच्या ४८व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

३. स्मिता पाटील

स्मिता पाटील यांचं फिल्मी करियर फक्त १० वर्षांचं होत . इतक्या कमी वेळातदेखील त्यांनी लोकांवर आपला ठसा उमटवला. हिंदी बरोबरच त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही खूप नाव कमावले. पण वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षीच त्या स्वर्गवासी झाल्या.

४. अमजद खान

अमजद खानशिवाय शोलेची कल्पना करणेदेखील अवघड आहे. गब्बरच्या रोलमध्ये जीव ओतणारे अमजद खान जास्त आयुष्य घेऊन नव्हते आले. वयाच्या ५२व्या वर्षीच ते या जगाला सोडून गेले.

५. लक्ष्मीकांत बेर्डे

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. ते महाराष्ट्राचे सुपरस्टार होते. मराठीसोबत त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टी पण गाजवली होती. पण वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला होता.

६. संजीव कुमार

मोठ्या पडद्यावर आपल्या कलाकाराची छाप पाडणारे संजीव कुमार जगण्याच्या लढाईत खूप लवकर हरले. वयाच्या ४७ वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

७. तरुणी सचदेवा

अमिताभ बच्चन यांच्या पा या चित्रपटात झळकलेली बालकलाकार तरुणी सचदेवा हिचा नेपाळमध्ये विमानअपघातात मृत्यू झाला. तरुणीला रसना गर्ल या नावानेदेखील ओळखतात.

८. मधुबाला

मधुबाला ही बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री होती जिच्या सौंदर्याचे सर्वच चाहते होते. मुघल ए आझम मध्ये त्यांचं काम अप्रतिम होता. कोणी म्हणणार पण नाही कि त्यावेळेला त्या आजारी होत्या. त्या वयाच्या ३६व्या वर्षीच हे जग सोडून गेल्या.

९. मीना कुमारी

मीना कुमारी यांनी चित्रपटांमध्ये जसे दुःखभरे पात्र निभावले आहेत तसेच त्यांचे आयुष्य पण दुःखाने भरलं होत. मीना कुमारी यांनी वयाच्या ३९व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

१०. आदेश श्रीवास्तव

संगीत दिग्दर्शक आदेश श्रीवास्तव यांनी बॉलीवूडला अनेक उत्कृष्ट गाणे दिले आहेत. त्यांच्या आवाजाची जादू अजूनही लोकांच्या मनात कायम आहे . वयाच्या ५१व्या वर्षी कॅन्सरमुळे त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1086Shares
error: Content is protected !!