सागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर ! या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा !

मराठी माणसाला मुंबई त राहणे अवघड झाल्याचे आपण वाचत असतो. हा यातला राजकारणाचा भाग सोडला तर हि गोष्ट काही तितकीशी खरी आणि वास्तविक वाटत नाही. त्याला कारण हि तसच आहे ते म्हणजे मराठी माणूस दिवसेंदिवस करत असलेली प्रगती. कालच आम्ही जगातली सगळ्यात महागडी कॅडिलॅक हि ५.२५ करोड ची गाडी भिवंडी च्या एका तरुणाने घेतल्याच आर्टिकल लिहिलं होत त्याला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला यावरून मराठी माणसाची वज्रमूठ काय असते हे समजते !

आता असाच अजून एक आर्टिकल आम्ही शेअर करत आहोत जे आहे तुमच्या आणि आमच्या अगदी लाडक्या कलाकाराचे. चला हवा येऊ द्या मधील सागर कारंडे ची वेगळी ओळख करून द्यायची तशी काहीच गरज नाही म्हणा.

मुंबईमध्ये स्वतःचं घर असणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. असं घर जे नवीन स्वप्न दाखवायला बळ देतं आणि ती स्वप्नं पूर्ण झाली की परत त्या घरात येण्याची ओढ निर्माण करतं. सागर कारंडेच्या बाबतीतही असंच काहीसं झालं आहे. सागरने काही दिवसांपूर्वीच एक नवीन घर घेतलं. या घरात त्याने पूजाही घातली. त्याचे माहिमला स्वतःचे घर तर आहेच. ज्या घराने त्याला नावारुपाला आणलं त्याच घराच्या साक्षीने त्याने आता अजून एक घर घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी या घरात त्याने पूजाही केली होती. पूजेचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअरही केले होते. त्याच्या या फोटोंना त्याच्या चाहत्यांनी भरभरून लाइक्स आणि कमेन्ट्सही दिल्या. ‘फू बाई फू’, ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमांमुळे प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर या अवलिया ने मंबई त नुकतच स्वतःच घर घेतलं. चला तर मग जाणून घेऊ या संबंधी. सागर ने नुकताच आपल्या फेसबुक अकाउंट वर घराचे फोटो टाकून हि आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली ..

१ तासात या फोटोस ना ७ हजारांहून लाईक्स आले.

सागर ला त्याच्या भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा. चला तर मग कंमेंट्स मध्ये तुम्ही हि शुभेच्छा द्या आणि हो हे आर्टिकल शेअर करून प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची हे वेगळं सांगायला नको !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

569Shares
error: Content is protected !!