बॉयलर चिकन खात आहात… सावध राहा… सविस्तर वाचा

स्वस्त आणि सर्वांना परवडणारं असतं त्यामुळे बॉयलर चिकनला सर्वांची पसंती असते. शिवाय बॉयलर चिकन हे गावरानी चिकन पेक्षा पचायलाही हलकं असतं. त्यामुळे या चिकनला मागणी अधिक असते. मात्र बाजारातून चिकन खरेदी करताना काही दक्षता घ्यायलाच हवी, कारण यावेळी झालेलं दुर्लक्ष अनारोग्यांचं कारण ठरू शकतं.

बाजारातून प्रामुख्याने बॉयलर चिकनची खरेदी केली जाते. पण जास्त मांस मिळवण्याच्या लालसेपोटी या कोंबड्यांना रसायनयुक्त औषधं आणि काही इंजेक्शनचा डोस दिला जातो. कोंबड्या लवकर मोठय़ा होण्यासाठीही काही औषधं दिली जातात. ही औषधं त्यांच्या मासांच्या गुणवत्तेवर प्रभाव टाकणारी ठरतात. म्हणूनच बॉयलर चिकनपेक्षा देशी अथवा घरी पाळलेली कोंबडी खाण्यास अधिक सुरक्षित असते असं तज्ज्ञ सांगतात. आज याविषयी काही मुद्दे जाणून घेऊ.

1) बॉयलर कोंबड्यांच्या कच्च्या मांसात बरेच किटाणू आणि जीवाणू असतात. या कोंबड्या एका बंदिस्त जागेत मोठय़ा संख्येने ठेवल्या जातात, वाढवतात आणि कापतात. या सर्व प्रक्रियेदरम्यान त्यांना विविध संसर्गांचा मोठा धोका असतो. त्या मोठय़ा संख्येने कापल्या जातात आणि मांस धुतलं जातं त्यावेळीही जंतूसंसर्ग संभवतो. मांसावाटे या संसर्गाचा आपल्यावरही प्रभाव जाणवतो.

2) मोठय़ा सं.ख्येने पक्षी कापले जात असताना कोंबड्यांबरोबर काही अन्य पक्ष्यांची कटाई होत असते. त्यावेळी त्या पक्ष्यांमधील बॅक्टेरिया कोंबड्यांच्या शरीरात संसर्ग उत्पन्न करु शकतात.

3) कमीत कमी देखभालीत कोंबड्यांची वाढ व्हावी, त्यांच्या शरीरातील रोगप्रतिरोधक शक्ती चांगली रहावी आणि साथीच्या रोगांचा प्रभाव कमी व्हावा या हेतूने बॉयलरमधील कोंबड्यांना अँटी बायोटिक इंजेक्शन दिली जातात. मात्र हा जास्तीचा डोस त्यांच्या मासांमध्ये असे काही गुणधर्म निर्माण करतो की जे मानवी शरीरासाठी घातक ठरू शकतात.

4) बॉयलर चिकन खाल्ल्याने फूड पॉयझिंगचा धोका वाढतो. एका संशोधनानुसार यात ६७ टक्के ईकोली बॅक्टेरिया असतात. याच्या संसर्गामुळे मानवी शरीर अनेक रोगांना बळी पडू शकतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

322Shares
error: Content is protected !!