अवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप

दिनांक : १५,१६ व १७ फेब्रुवारी,२०१८ ला बी.आर.हायस्कूल,अकोला येथे वाशिम,बुलढाणा व अकोला या तीन जिल्ह्यांचीे “इन्स्पायर विज्ञान प्रदर्शनी २०१८”आयोजित करण्यात आली होती.यामध्ये शाळेची विद्यार्थिनी कु.अवंती गोपाल खाडे,वर्ग ७ वा, हिने वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.तिच्या ‘दिव्यांगांना रस्ता दाखवणारी कुबडी-नव्हे दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे.

ही कुबडी वैशिष्ट्यपूर्ण आहे.ती रस्त्याने चालतांना प्रकाश देणारी,चालतांना मनोरंजन करणारी,आरोग्याची काळजी घेणारी म्हणजे प्रथमोपचार पेटी उपलब्ध असलेली ,तसेच कमोड शौचालय सिट व्यवस्था असलेली,रस्त्याने जातांना मार्ग दर्शवणारी,चोर ओळखणारी आणि अतिशय कमी वजन असलेली अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी दिव्यांगांना उपयुक्त कुबडी अवंतीने तयार केली आहे.प्रदर्शनीला उपस्थित अकोला जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. राममूर्ती व मान्यवरांनी, परीक्षकांनी अवंतीचे खूप कौतुक केले.तिची प्रतिकृती प्रदर्शनीच्या आकर्षणाचा विषय होता.”दिव्यांगांचा एक आधार” म्हणून ही कुबडी बहूमोल अशी आहे. अवंतीच्या या भन्नाट कल्पनेचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

तिला या प्रतिकृतीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाश्री भडंगे मॅडम,पर्यवेक्षिका मनिषा रायबागकर मॅडम व विज्ञान शिक्षिका मेघा उफाडे मॅडम व शुभांगी काळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.अवंतीला तिचे वडील गोपाल खाडे आणि आई नीता खाडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.तिची राज्यस्तरासाठी निवड झाल्याबद्दल कंकुबाई परिवारातर्फे तिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि राज्यस्तरीय सहभागासाठी हार्दिक शुभेच्छा..!!

कुबड्या नव्हे -दिव्यांगांचा मित्र…..

दिव्यांगांचा मित्र या प्रकल्पाची भन्नाट कल्पना सुचलेली अवंती गोपाल खाडे….

मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह व भेटवस्तू
स्वीकारतांना अवंती….. सोबत विज्ञान शिक्षिका उफाडे मॅडम व काळे मॅडम,अवंतीची आई नीता खाडे

कुबड्यांविषयी माहिती सांगतांना अवंती….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

46Shares
error: Content is protected !!