Arts ची आवड असून सुद्धा Science घेऊन बसतात, स्वत:च्या स्वप्नांना दूर ठेवून, फक्त तुमच्या स्वप्नांसाठी नक्की वाचा

एक चांगला मेसेज फॉरवर्ड करीत आहे कोणी लिहिले माहिती नाही

हृदयस्पर्शी एक मध्यमवर्गीय कुटुंब

आई-बाबा आणि तरुण मुलगा

अमित (एक काल्पनिक नाव) आपल्या आईबाबांबरोबर राहत
होता

अगदी हुशार , प्रामाणिक

आणि आईबाबांवर जीवापाड प्रेम करणारा

परंतु अमित college ला जायला लागल्यापासून थोडा बिघडायला लागला

त्याला मित्रांची संगत लागली, आणि काही दिवसांनी तर तो रात्र-रात्रभर बाहेरच असायचा

त्याच्या बाबांना याची खूप चिंता वाटू लागली, आपल्याला न सांगता हा रोज कुठे जात असेल ?

२-३ महिने तर तो असाच वागत होता, उशिरा येणं, सकाळी लवकर जाणं, अभ्यास न करणं,आणि

फक्त laptop वर बसून उचापत्या करणं

एक दिवस व्हायचे तेच झाले , अमित रात्री उशिरा आला खरा पण त्याला चालायची सुद्धा शुद्ध नव्हती

पण का कोण जाणे त्याने,.. आईला घट्ट मिठी मारली व रडू लागला, आईने त्याला सावरलं. तरी तो बाबांना सुद्धा घट्ट मिठी मारून रडू लागला बाबांना ह्या वेळी मात्र राग आवरला नाही, त्यांनी त्याच्या जोरात कानाखाली मारली आणि जे त्यांनी कधी स्वप्नातही पाहिले नव्हते ते घडले

अमितच्या तोंडातून रक्त बाहेर आले आणि तो जमिनीवर कोसळला ! तेवढ्यात बाहेरून त्याचे मित्र धावत आले, ते खुश दिसत होते परंतु समोरचं दृश्य पाहून ते थबकुनच गेले त्यातला एक पुढे आला आणि त्याच्या बाबांना समजावू लागला

बाबा तुमचा अमित नाही राहिला आई अमित जवळ बसून रडू लागली, पण बाबा मात्र निशब्द झाले, त्यांना काहीच कळलं नाही

बाबा तुम्ही जे समजत होतात तसं काहीच नव्हतं ३ महिन्यापूर्वी अमित college मध्ये असताना त्याला चक्कर आली, तेव्हां तातडीने आम्ही त्याचे reports काढले, बाबा अमितला blood cancer
होता. हे त्याला कळलं तेव्हां त्यानेच आम्हांला सांगितलं कि आई बाबांना काहीच सांगू नका, त्यांना दुःखी झालेलं मला नाही बघवणार

त्याला माहित होतं कि तो जास्त दिवस नाही जगणार, बाबा त्यानंतर २-३ महिने तो college ला नाही गेला, त्याच्या सोबत आम्ही त्याच्या स्वप्नातला music album Launch करण्यासाठी झगडत होतो.

त्याचं एकच म्हणणं होतं कि मी जायच्या आत आई-बाबांना कसलीही कमी भासणार नाही असं काम करून जाईन.

बाबा हा घ्या blank cheque कंपनीने अमितचे Songs ऐकून हा blank cheque दिला आहे.

बाबा कोसळले, आणि अमितचा देह मांडीवर घेऊन त्याच्याकडे बघत राहिले

अनेकदा असं होतं, आई-बाबांना वाटतं कि आपला मुलगा वाया गेला, पण काही वेळा तसं नसतं हो, तुमच्यासाठी झटणारे पण काही मुलं असतात, त्यांना विश्वासात घ्या

आज अमित नव्हता, पण आई-बाबांसाठी खूप काही करून गेला होता. त्यांचे चांगले मित्र व्हा,

रोज त्यांच्याशी हितगुज करा

त्यांना त्यांची ध्येय विचारा

तुमच्या मुलांमध्ये सुद्धा कला असेल

कधी कधी तुम्हाला मान खाली घालावी लागू नये

म्हणून Arts ची आवड असून सुद्धा Science घेऊन बसतात, स्वत:च्या स्वप्नांना दूर ठेवून, फक्त तुमच्या स्वप्नांसाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

394Shares
error: Content is protected !!