लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये

जापानीज़ लावा हा कुक्कुट या संवर्गातील पक्षी. लावा पक्षाचे मास खाण्यास पौष्टिक असून त्यामध्ये प्रथिने, खनिजे, लोह आणि जीवनसत्व भरपूर असतात. तामिळनाडु राज्यातील कन्याकुमारी या जिल्हयात मोठया प्रमाणात लहान शेतकरी लावा फार्मिगं करतात

लावा पालन अत्यंत सोपे आहे. 500 स्क्वेयर फुट जागेत 2000 पक्षी राहु शकतात. कमी कालावधीत, कमी खर्चात, हा पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी करू शकतात. शिवाय या पक्षाला कुठल्याही रोगप्रतिकारक लसीची गरज नाही. त्यामुळे लसिकरणाचा खर्च शुन्य आहे. शिवाय पशु वैद्यकीय डॉक्टरची पण गरज पडत नाही. कोंबड़ीला लागणारे खाद्याच या पक्षाला लागते. एक महिन्यात 150 ग्रॅम वजनाचे पक्षी विक्रीसाठी तयार होतात. पक्षाची एक जोड़ी 130 रुपयाला तर ठोक मध्ये 50 रुपये प्रति पक्षी याप्रमाणे दर मिळतात.

2013 पर्यंत हा पक्षी पाळण्यावर केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण विभागाने बंदी घातली होती.6 डिसेंबर 2013 रोजी या “जापनीज़ क्वेल्स” म्हणजेच जापानी लावावरील बंदी उठवून त्याला पोल्ट्री फ़ार्मिंगसाठी मान्यता देण्यात आली. मात्र प्रत्येक व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यातील अनुभव आणि खाचखळगे समजून घेणे महत्वाचे असते.

भंडारा जिल्ह्यात अभिषेक पवार आणि सचिन घारगडे या दोन मित्रांनी या सुवर्ण संधीचा फायदा घेत खुर्शीपार येथील शेतात लावा फार्मिंग सुरु केले आणि केवळ सव्वा वर्षात आज ते नागपुर, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, या जिल्ह्यात लावा पुरवठा करणारे एकमेव पुरवठादार झाले आहेत. भंडारा शहरापापासून वरठी रोडवर 10 किलोमीटर अंतरावर असणारे खुर्शीपार गाव. याच गावात अभिषेक आणि सचिन हे दोघे मित्र पदवी आणि कृषि पदविका धारक तरुण, वडिलोपार्जित शेती करतात. मात्र काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास दोघांचाही मनात घोळत होता.

अभिषेकच्या पशु वैद्यकीय डॉक्टर असणाऱ्या मावस भावाने त्याला लावा पक्षी पालनाबाबत मार्गदर्शन केले. यातून प्रेरणा घेत अभिषेक पवार याने त्याच्या शेतात 1500 चौरस फुट जागेवर जाळी लावून शेड तयार केले. छत्तीसगडमधील दुर्ग येथून एक दिवसाचे 1000 लावा पिल्ले त्यांनी विकत आणले. त्यासाठी 12 हजार रुपये खर्च आला. आणलेल्या 1000 पिल्लांपैकी 500 पिल्ले 15 दिवसातच दगावाले. यातून सावरत एकेक अनुभव घेत त्यांनी 500 पक्षाना वाचवले. एक महिन्यात हे पक्षी 150 ग्रॅम वजनाचे झाले. विक्रीसाठी तयार झालेले पक्षी विकण्यासाठी त्यांनी बाजरपेठेच्या शोधात नागपुर गाठले.

आतापर्यंत यांनी 30 हजार पक्षी विकलेत आणि त्यातून 15 लाख रुपयांचा नफ़ा झाला आहे. केवळ सव्वा वर्षात त्यांनी लावा पालनातून येथपर्यंत मजल मारली आहे. आज गोंदिया, चंद्रपुर, नागपुर, गडचिरोली आणि भंडारा या पाचही जिल्ह्यात त्यांचे लावा पक्षी विक्रीसाठी जातात. याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे या पक्षाची पिल्ले दुर्ग, पुणे आणि हैद्रराबाद येथे मिळत असल्यामुळे पक्षी आणायला त्रास होतो. एक दिवसाचे पक्षी आणले तर त्यांचे रस्त्यातच दगावण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात हॅचरी सुरु करण्याचा मानस अभिषेक पवार यांनी व्यक्त केला. जिल्हयातील इतर तरुणांनाही मार्गदर्शक ठरेल, अशा प्रकारचा कुक्कुट पालनाच्या व्यवसायातून अभिषेक आणि सचिन यांनी आर्थिक उन्नतीची कास धरली आहे

2 thoughts on “लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये

 • 30/12/2017 at 1:53 pm
  Permalink

  im also intrested this business pls help me

  Reply
 • 01/01/2018 at 12:02 am
  Permalink

  punyamadhe kothe bhetatat hi pille

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9687Shares
error: Content is protected !!