65 च्या वयात 1009 वेळा अपयश आले पण निराश नाही झाला हा उद्योगी आणि उभी केली जागतिक किर्तीची कंपनी केएफसी ??

प्रत्येक माणसाने यांच्या कडून शिकले पाहीजे की उद्योग करतांना यश मिळवण्यासाठी किती धैर्य धरले पाहीजे. जर तुमच्या मध्ये काही तरी करून दाखवण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर तुम्ही वय आणि इतर अनेक समस्यांचे अडथळे पार करून जीवना मध्ये यशाच्या शिखरा वर जाऊ शकता आणि कर्नल हारलैंड सांडर्स यांची गोष्ट काही हेच सांगते.

तुम्ही विश्वप्रसिद्ध केएफसी चे प्रशंसक असाल किंवा नसाल पण याचे संस्थापक सांडर्स यांच्या संघर्षा बद्दल माहीती मिळाल्यावर तुम्ही त्याचे चाहते नक्की बनाल.

कर्नल हारलैंड सांडर्स त्यांच्या दृढ़ता, निष्ठा और महत्वाकांक्षा यामुळे आजच्या युवा पिढीसाठी एक रोल मॉडल बनले आहेत. सांडर्स यांच्या संघर्ष आणि मेहनती बद्दल माहीती मिळाल्यावर कोणीही त्यांचा चाहता होतो. जगातील कदाचित असा एखादाच देश असेल जेथे जेवणाचे शौकीन सांडर्सच्या “फिंगर लिकिन गुड” फ्राईड चिकन च्या नावाला ओळखत नसतील.

डोळ्यावर चष्मा असलेले सांडर्स तुम्ही स्वच्छ सफेद सुट, काळी टाई  आणि हातात पकडलेली छडीने तुम्ही त्यांना सहज ओळखू शकता आणि केएफसी च्या प्रत्येक बोर्ड वर तुम्ही यांना याच रुपामध्ये पाहू शकता.

कर्नल सांडर्स च्या जीवना मध्ये आकस्मित वळण तेव्हा आले जेव्हा त्यांनी 65 वर्षाच्या वयात आपले रेस्टॉरंट बंद केले. संपूर्ण आयुष्य मेहनत केल्या नंतर ही त्याच्याकडे या वयात बचत म्हणून काही नव्हते आणि ते अगदी कंगाल होते.

65 वर्षाच्या वयात त्यांनी रेस्टॉरंटला टाळा लावला आणि रिटायरमेंट घेऊन आरामात आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी त्यांना सामाजिक सुरक्षा म्हणून मिळणारी रक्कमेचा पहिला चेक मिळाला ज्याने त्यांचे आयुष्य बदलून टाकले.

कदाचित त्यांच्या नशिबा मध्ये काही वेगळेच लिहून ठेवले होते. पेंशन मध्ये मिळालेले 105 डॉलरची रक्कमेतून त्यांच्या प्रसिद्धी आणि आर्थिक समृद्धीची एक नवीन ओळख त्यांना मिळणार होती. या रकमेने त्यांचे जीवन बदलून टाकले आणि त्यांनी काही असे काही करण्याचे ठरवले ज्यामुळे भविष्यामध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द केले.

कर्नल सांडर्स खाण्याचे आणि खाऊ घालण्याचे शौकीन होते आणि चांगले मेजबान होते. ते अतिशय सुंदर फ्राईड चिकन बनवायचे आणि त्यांना भेटण्यासाठी आलेले सर्व पाहुणे या चिकनचे स्तुती करायचे.

65 वर्षाच्या वयात जेथे लोक आरामपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो तेथे यांनी काही तरी नवीन करण्याचे ठरवले. त्यांनी ठरवले की त्यांची फ्राईड चिकनची रेसेपी लोकांच्या पर्यत पोहोचवायची.

लोकांच्या पर्यंत रेसेपी पोहचवण्याचा हा निर्णय सांडर्स साठी तेवढा सोप्पा नव्हता आणि त्यासाठी सांडर्स यांना दिवसरात्र एक करून प्रयत्न करावे लागले. सुरुवातीला सांडर्स घरोघरी आणि रेस्टॉरंट मध्ये जाऊन त्यांनी बनवलेल्या चिकन बद्दल सांगायचा. सांडर्स यांना आशा होती की त्यांना कोणी तरी असा मिळेल जो त्यांनी बनवलेल्या चिकनचा असली स्वाद ओळखेल आणि रेसेपीला दुसऱ्या लोकांच्या पर्यत पोहोचवण्यासाठी त्यांना मदत करेल पण प्रत्येक वेळी त्यांना नकार मिळायचा.

स्वभावाने हट्टी असलेल्या सांडर्सनी सुरुवातीच्या या अपयशाने हार मानली नाही. ते प्रयत्न करत राहीले ते वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन तेथील किचनमध्ये फ्राईड चिकन तयार करायचे. जर हॉटेल मालकाला ही रेसेपी आवडली तर हॉटेल मालक फ्राईड चिकन त्याच्या मेनूकार्ड मध्ये शामिल करायचा. पण खरी गंमत ही आहे की असे करणारा पहिला हॉटेल मालक मिळवण्यासाठी सांडर्स यांना 1009 लोकांकडून नकार ऐकावा लागला. पण त्यांनी हार मानली नाही.

1009 लोकांनी नकार दिल्यानंतर पहिला व्यक्ती मिळाला जो सांडर्सची फ्राईड चिकन रेसेपी विकण्यास तयार झाला. यापद्धतीने सुरु झाला केएफसी चा प्रवास. कर्नल आणि हॉटेल मालकांमध्ये हा करार झाला की विकले गेलेल्या प्रत्येक फ्राईड चिकनसाठी हॉटेल मालक सांडर्स याना 5 सेंट देतील. यापद्धतीने केएफसी लोकांच्या पर्यत पोचण्यास सुरुवात झाली.

हे चिकन बनवण्यासाठी कोणत्या मसाल्यांचा वापर होतो हे गुपित कायम गुपित राहण्यासाठी सांडर्स मसाल्यांचे पाकीट रेस्टॉरंट मध्ये पाठवायचे ज्यामुळे त्यांच्या रेसेपीची गुपित कोणाला समजले नाही.

वेळ पुढे जात राहीला आणि वर्ष 1964 मध्ये कर्नल सांडर्स यांनी बनविलेली ही रेसेपी इतकी प्रसिद्ध झाली की त्यावेळी जवळजवळ 600 ठिकाणी ती विकली जाऊ लागली. याच वर्षी कर्नल सांडर्सनी केएफसी जवळपास 20 लाख डॉलर एवढ्या भल्या मोठ्या रकमेला दुसऱ्याला विकली.पण सांडर्स कंपनीचे प्रवक्ता पदावर कायम राहीले.

सांडर्स यांनी बनविलेल्या चिकन ने त्यांना एवढी प्रसिद्धी दिली की वर्ष 1976 साली जगातील सर्वात प्रसिध्द लोकांच्या यादीमध्ये ते दुसऱ्या स्थानी होते. यापद्धतीने कर्नल हारलैंड सांडर्स यांनी जगाला दाखवून दिले की 65 वर्षाच्या वयामध्ये जेव्हा बहुतेक सर्व लोक रिटायर होऊन घरी बसण्याची तयारी करतात तेव्हा जर कधीही हार न मानण्याच्या जिद्दीने कोणते काम केले तर यश तुमचेच होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

602Shares
error: Content is protected !!