राज्यसेवा मुलाखत तयारी भाग-१

राज्यसेवाच्या मागील वर्षातील मार्काचा आणि मिळालेले पदांचा विचार करता मुलाखती मधील गुण हे तुम्हाला कोणते पद मिळणार हे ठरवत आहे. त्यामुळे मुलाखतीची तयारी चांगली करा.

पुर्व परीक्षा आणि मुख्य परिक्षा या दोन पेपरमध्ये तुमची ज्ञानाची कसोटी अगोदरच चेक केली आहे. मुलाखत ही तुमच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे हे लक्षात असु द्या.

मुलाखतीचे वेळापत्रक पण आले आहे. आपल्याला मुलाखतीच्या दिनांकानुसार तयारीचे नियोजन करा.

मुलाखत ही बोलण्याची परीक्षा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बोलण्याचा सराव करा. वाचणापेक्षा बोलणे जास्त महत्वाचे आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कोणताही प्रश्न घ्यायचा आणि स्वतःशी तुमच्या मित्राशी, तुमच्या शिक्षकांशी याबाबत उत्तर सांगायचा प्रयत्न करा

मुलाखतीची तयारी करताना प्रथम तुमचा Biodata चांगला Prepare करा.  त्यामध्ये

१]तुमचे गाव – वैशिष्ट्ये, समस्या, समस्येचे सोडवणूक

२]तुमचा जिल्हा – वैशिष्ट्ये, समस्या, समस्येचे सोडवणूक

३]आई-वडिलाबद्दल माहिती

४]तुमची शैक्षणिक पार्श्वभुमी

५]पदवीबद्दलची सद्य स्थिती

६]सदया करत असलेला Job

७]तुमचे छंद , आवड

वरील सर्व विषयाबाबत चालू घडामोडीबाबतची माहिती

मला विचारले गेलेले Biodata वर अधारीत प्रश्न

१]तुम्ही कोठून आलात ?

२[तुमचे 11 वी 12 वीला विषय कोणते होते ?

३]BAMS ला कोणते विषय होते?

४]सोलापूर जिल्ह्याची पर्जन्यक्षमता किती आहे ?

५]सोलापूर जिल्ह्याची सिंचनक्षमता किती आहे ?

६]पर्जन्यवृष्टी कमी असताना सिंचन क्षमता जास्त का?

७]वडिल काय करतात ?

८]Forensic science च्या काही term विचारल्या

९]सध्या काय करता?

१०]UPSC च्या मुलाखती संदर्भात काही प्रश्न विचारले

मुलाखतीमध्ये मोठ्या प्रमाणावर factual प्रश्न विचारले जातात. त्या सर्वच प्रश्नांची उत्तरे यायलाच हवी असे काय नाही. कधी कधी तुम्हाला comfort करण्यासाठी असे प्रश्न विचारले जातात. तुमच्या knowledge ची परीक्षा अगोदरच झालेली आहे याचे भान असावे.
उदा. मला माझ्या मुलाखतीमध्ये I.C.S. या परिक्षेचा long form विचारला होता? या प्रश्नाचे उत्तर मला देता आले नाही.

स्तोत्र – missionmpsc.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

288Shares
error: Content is protected !!