प्रत्येक भावाने आणि बहिणीने वाचावे असे सुंदर छान काही क्षण…….

ए जा निघ कधी लग्न करून जातेस ना याचीच वाट बघतोय..तुझ्या लग्नात थोड पण रडणार नाही’,
अस बोलतो तो भाऊ असतो.

लग्न झाल्यावर काय करशील ते दिसतय
अस बोलतो तो भाऊ असतो.

तुझ्यापेक्षा मी जास्त गोरा आणि सुंदर आहे काळे
अस बोलतो तो भाऊ असतो.

सगळ्यांचे कपडे choice करुन देतो पण स्वतः मात्र बहीणीच्या choice ने कपडे घेतो तो भाऊ असतो… ‘ही style मला suit होतेय का?’हे gf आधी बहीणीला १०० वेळा विचारतो तो भाऊ असतो

नवीन bike घ्यायची आहे तेवढ बाबांच्या डोक्यात घाल ना’अस सांगतो तो भाऊ असतो

माझ्या phone ला हात लाऊ नकोस’पण आपला phone हक्काने घेतो(फक्त फुकट hotspot ने net वापरण्यासाठी) तो भाऊ असतो.

दमदाटी करुन कधी ही स्वताःचे कपडे हक्काने धुवायला लावतो तो भाऊ असतो.

तोंडावर कडु पण मित्रांच्यात बहीणी बद्दल खुप बोलतो तो भाऊ असतो….. ए आई हिला गप बसव नायतर ही गेली आता अस टपोरी भाषेत बोलतो तो भाऊ असतो.

पण बहीणीच्या लग्नात गपचुप एका बाजुला रडत असतो ना तो भाऊ असतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

694Shares
error: Content is protected !!