आपली शर्यत नोंदवण्याकरिता आपला मोबाईल क्रमांक नोंदवा.
शर्यत टीम आपल्याला २४ तासाच्या आत संपर्क साधेल
गाडा मालकांचे “शर्यत सोलुशन” बद्दलचे मनोगत
पै. पुष्करशेठ राजेंद्र नेवाळे (टाळगाव चिखली)
शर्यत सोल्यूशन हे आपल्या झालेल्या सर्व शर्यतींचे निकाल एका प्लॅटफॉर्म वर आणण्याचे
कार्य करत आहे.
आपल्या बैलगाडा शर्यत ला पूर्ण जगभर प्रसिद्धी मिळवण्यासाठी व सर्व गाडा मालकांना एकत्रित आणण्यासाठी
एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. तरी सर्व गाडामालकांनी आपली नोंदणी शर्यत ॲपवर लवकरात लवकर करून घ्यावी.
श्री. संदिपसाहेब बोदगे (शर्यत अभ्यासक, मार्गदर्शक - अहमदनगर)
या आधुनिकी करणामुळे आपले पारंपरिक खेळ हे खूप कमी खेळले जात आहेत आणि बरेचसे खेळ हे
जवळ जवळ बंदच झाले आहेत. आता ज्या खेळाला आधुनिकी करणाची जोड मिळते तो खेळ खूप प्रसिद्ध होतो आणि
मोठ्या संख्येने खेळला सुद्धा जातो. कबड्डी आणि खो खो या सारखे खेळ हे जवळ जवळ बंदच झाले होते पण
जेंव्हा त्यामध्ये आधुनिकता आणुन ते समोर आणले त्यामुळे त्या खेळाचा दर्जा उंचावला आणि ते पुन्हा
मोठ्या प्रमाणात खेळले जाऊ लागले. बैलगाडा शर्यत सुद्धा आपला पारंपरिक खेळ आहे तो सुद्धा खूप मोठ्या
प्रमाणात प्रसिद्ध आहे व मोठ्या संख्येने पाहिला जातो. ह्या सर्व गोष्टी बघता शर्यत सोल्युशन ने
शर्यत ॲप बनवण्याचे ठरवले आहे शर्यत ॲप ही संकल्पना खूप चांगली आहे. आता सर्व आयोजक आणि बैलगाडा मालक
यांना शर्यत ॲपमुळे
खूप गोष्टी सोयीस्कर होतील.
श्री. बाळासाहेब गणपतराव साकोरे (फुलगाव)
आपला सर्वात प्रसिद्ध आणि जुना पारंपरिक खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत आणि शर्यत
सोल्युशन हे या आधुनिक जगात याला एक नवीन स्वरूप देण्याचे कार्य करत आहे. यामध्ये आपण सर्व
गाडामालकांचा एक संघ होऊन आपण एकत्रित येणार आहोत. यासाठी आपल्यला शर्यत सोलुशन वर आपली नोंदणी करणे
गरजेचे आहे तरी सर्व गाडामालकांनी आपली नोंदणी हि लवकरात लवकर करून घ्यावी.
श्री. अजयशेठ पारखी (मान)
शर्यत सोल्यूशन बद्दल सांगायचे म्हटले तर आम्ही यावर्षी माण मध्ये सर्व प्रथम
बैलगाडा
शर्यतीचे आयोजन केले. आम्ही टोकन व सर्व स्पर्धेचे निकाल हे नियोजित करण्याचे काम हे शर्यत सोलुशनला
ऑनलाईन पद्धतीने करायला दिले त्यामुळे आमच्या आयोजकांचे काम खूप सोपे झाले. शर्यत सोल्यूशन च्या
सहकार्याने आमची माण ची स्पर्धा हि यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
श्री. दत्तात्रयशेठ धोंडिबा मोरे (टाळगाव चिखली)
शर्यत सोल्यूशन हे आपल्या सर्व गाडामालकांसाठी व बैलगाडा प्रेमींसाठी शर्यत नावाचे
ॲप आणत आहे. शर्यत टीम ने श्री क्षेत्र टाळगाव चिखली या घाटामध्ये टोकन पासून सर्व स्पर्धेच्या
निकालांचे नियोजन हे उत्तमरीत्या पूर्ण केले. या स्पर्धेमध्ये शर्यंतीचे सर्व निकाल हे संगणकाद्वारे
भरून ते आपण मोबाइल वर बघू शकत होतो. त्यामुळे शर्यत ॲप मध्ये आणखी खूप काही नवीन बघायला मिळेल अशी
आशा आहे.
श्री. रामकृष्ण टाकळकर (खेड)
शर्यत सोल्युशन बद्दल सांगायचे म्हटले तर मा. श्री. दिलीप आण्णा मोहिते पाटील
यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुका सहकार बैलगाडा संघटना आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीचे टोकण
काढण्यापासून तर सर्व बक्षीस वितरणापर्यंतचे सर्व रेकॉर्ड्स हे शर्यत सोल्युशन्स तर्फे ऑनलाईन
पद्धतीने नियोजित केले गेले होते. व एका लिंक द्वारे ते सर्व निकाल मोबाइल वर सुद्धा पाहता येत होते.
शर्यत सोल्युशन ने टोकन ते बक्षीस वितरणापर्यंतची कामगिरी हि अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण केली.
श्री. मयुर मोहिते पाटील (खेड)
मा. श्री. दिलीप आण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुका सहकार
बैलगाडा
संघटना आयोजित श्री क्षेत्र निमगाव खंडोबा येथे दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा भव्य बैलगाडा
शर्यतीचे आयोजन करण्यात आले. आम्ही यावेळेस सर्व टोकन नोंदणी व शर्यतीच्या बारींचे रेकॉर्डस् हे
ऑनलाईन पद्धतीने करण्याचे ठरवले. आणि हे सर्व कामकाज शर्यत सोल्युशन कडे सोपवले. त्यांनी संपुर्ण
स्पर्धा हि बिनचूक यशस्वीरीत्या पार पाडली. त्याबद्दल त्यांचे आभार !!!